‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेलं जोडपं राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांची लग्नघटिका समीप आली आहे. या दोघांचं लग्न उद्या म्हणजे 2 डिसेंबरला पार पडणार आहे. पण सध्या अक्षया आणि हार्दिकच्या मेंहंदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सध्या त्या दोघांच्याही घरी लग्नापूर्वीचे विविध विधी सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतंच हार्दिक जोशीच्या घरी हळदीचा सभारंभ पार पडला. तर दुसरीकडे अक्षयाच्या मेहंदीचा कार्यक्रम पार पडला.
2/ 8
येत्या २ डिसेंबरला ते दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत. सध्या त्या दोघांच्याही घरी लगीनघाई सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.
3/ 8
अक्षया देवधरने नुकतंच तिच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. तिच्या मेहंदीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
4/ 8
अक्षयाचा मेहंदीचा लूक पाहायला मिळत आहे. यात ती फारच सुंदर दिसत आहे. तसेच तिने मेहंदीसाठी परिधान केलेल्या ड्रेसही फारच हटके आहे.
5/ 8
त्यानंतर तिने हातावर आणि पायावर अत्यंत सुंदर अशी मेहंदी काढतानाचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओत चार जणी तिच्या हातावर सुरेख मेहंदी काढताना दिसत आहे.
6/ 8
अक्षयने हातावर वधू, प्रपोज करतानाचे एक जोडपे आणि सप्तपदीही पाहायला मिळत आहे. यावर अक्षया आणि हार्दिक असेही लिहिण्यात आले आहे. तिच्या हाता-पायावरील सुरेख मेहंदीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
7/ 8
अक्षया लग्नासाठी खूपच उत्सुक आहे. ती सगळे कार्यक्रम मनापासून एन्जॉय करत आहे. यावेळी ती फारच आनंदात असल्याचे पाहायला मिळत आहे.
8/ 8
हार्दिक आणि अक्षयाचा विवाहसोहळा पुण्यामध्ये पार पडणार आहे. या दोघांचं लग्न उद्या म्हणजे २ डिसेंबरला पार पडणार आहे. या दोघांच्या विवाहसोहळ्यासाठी त्यांचे चाहतेही उत्सुक आहेत.