अक्षय कुमारचा भाव आणखी वाढला: थोडी थोडकी नाही कोटींनी वाढवली फी; एका चित्रपटासाठी किती घेतो पाहा
अक्षय कुमारने (Akshay Kumar) आपली फी (Fee) वाढविली आहे. अक्षयकडे सध्या 'अतरंगी रे', 'पृथ्वीराज', 'राम सेतु', 'मिशन लॉयन', 'रक्षा बंधन' असे अनेक चित्रपट आहेत. जे येत्या 2 वर्षात प्रदर्शित होणार आहेत.


बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay kumar) एका वर्षात सर्वाधिक चित्रपट करणार्यांच्या यादीत अव्वल आहे. कमीत कमी दिवसांत चित्रपटाचं शुटींग संपवून दुसऱ्या चित्रपटाचं काम सुरू करायचं, असा त्याचा वर्षभराचा उपक्रम असतो. म्हणूनच तो वर्षभर कोणत्या ना कोणत्या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असतो. फोटो सौजन्य- @ akshaykumar / Instagram


त्यानं कदाचित लॉकडाऊनमध्येच आपल्या कुटूंबासमवेत वेळ घालवला असेल, अन्यथा अनलॉक होताच त्यानं पून्हा लगेच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. अलिकडच्या काही दिवसांपासून अक्षय कुमार आपली फी वाढवण्याच्या बातम्यांमुळे चर्चेत आला आहे.फोटो सौजन्य- screen grab from youtube/Pooja Entertainment


अक्षय कुमार बॉलीवूडमधील सर्वाधिक फी असणार्या कलाकारांपैकी एक आहे. अक्षय कुमार दरवर्षी किमान 2 ते 3 चित्रपट करतो. अक्षय कुमार एक दिवसासाठीही ब्रेक घेत नाही. पुढील वर्षी तर अक्षय कुमारचे एक दोन नव्हे तर एकूण 8 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. फोटो सौजन्य- screen grab from youtube/Pooja Entertainment


बॉलीवूड हंगामाच्या एका बातमीनुसार, लॉकडाऊनच्या काही महिन्यांतच अक्षयने आपली फी 98 कोटी रुपयांवरुन ती वाढवून 108 कोटी केली आहे. नुकत्याच साइन केलेल्या चित्रपटासाठी त्यानं तब्बल 117 कोटी घेतले आहेत, हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर 2022 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांसाठी त्यानं 135 कोटी रुपये घेतले आहेत.


अक्षयच्या बर्याच चित्रपटांचे प्रॉडक्शन बजेट 35 ते 45 कोटींच्या दरम्यान असेल. याशिवाय 15 कोटी रुपये प्रिंट आणि प्रोमोशनसाठी खर्च केले जातील. एकंदरीत या चित्रपटाचा एकूण खर्च 50 ते 60 कोटी रुपये असेल. त्याचबरोबर अक्षयच्या फीसहीत या चित्रपटांचं बजेट 185 ते 195 कोटी इतकं असेल.


अक्षय कुमार सध्या बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करतो. Forbs Highest Paid Actors 2020 च्या यादीत अक्षय जगातील सर्वाधिक कमाई करणारा सहावा अभिनेता म्हणून निवडला गेला.