

अभिनेता अक्षय कुमारचा 2009 मध्ये आलेला 'चांदनी चौक टू चायना' बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. पण यंदाच्या लोकसभा निवडणूकीआधी दिल्लीच्या चांदनी चौक मधील जागी भाजपचा उमेदवार म्हणून अक्षय कुमारचा विचार होत असल्याच्या चर्चा रंगल्या आहे


दिल्लीतील लोकसभा उमेदवारीच्या 7 जागांपैकी चांदनी चौकच्या जागेवर नेहमीच काँग्रेसची प्रबळ दावेदारी मानली जाते. प्रकाश अग्रवाल या जागेवर दोन वेळा खासदार बनले आहेत.


त्यानंतर भाजपचे विजय गोयल चांदनी चौक मधून निवडून आले आणि 2014 मध्ये भाजपाचे मुख्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन याच ठिकाणी खासदार म्हणून निवडून आले.


यावर्षी चांदनी चौकसाठी आम आदमी पार्टी कडून पंकज गुप्तांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर भाजपकडून एक स्टार कँडिडेट म्हणून बॉलिवूडच्या 'खिलाडी' अक्षय कुमारच्या नावाची चर्चा आहे.


अक्षय कुमार मुळचा दिल्लीचा राहणारा आहे. अनेकदा तो दिल्लीबाबत प्रेम व्यक्त करताना दिसतो. भाजपा उमेदवार म्हणून निवडणूक लढवणं अक्षयला शक्य नाही आणि यामागे एक खास कारणही आहे.


अक्षयचा आगामी चित्रपट 'केसरी' लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटाच्या प्रमोशनाच्या दरम्यान अक्षयनं तो येत्या लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं.


अक्षयला वाटतं की, तो आपल्या चित्रपटातून देशाला आपला संदेश योग्य प्रकारे पोहोचवत आहे आणि पुढच्या पाच वर्षांसाठी त्यानं बॉलिवूडला वेळ देण्याचं ठरवलं आहे. तसंच राजकीय क्षेत्रात उतरण्याचा त्याचा अजिबात विचार नाही, हेही त्यानं यावेळी स्पष्ट केलं.


अक्षयनं लोकसभा निवडणूक लढवण्याच्या शक्यता फेटाळून लावल्या आहेत. तसंच त्यानं पत्नी ट्विंकल खन्नालाही राजकीय बाबींवर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देण्याचा सल्ला दिला आहे.