

सध्या बॉलिवूडमध्ये बिग बजेट सिनेमांचा बोलबाला आहे. एकीकडे नवनव्या सिनेमांच्या घोषणा होत आहेत तर दुसरीकडे पुढील वर्षी रिलीज होणाऱ्या सिनेमांच्या समस्या वाढताना दिसत आहेत.


2020 मध्ये येणारे सर्वच बिग बजेट सिनेमांमध्ये 'काँटे की टक्कर' होताना दिसणार आहे. सलमान खान, अजय देवगण, दीपिका पदुकोण आदी स्टार कलाकारंच्या सिनेमांची रिलीज डेट सारखीच असल्यानं त्याच्यासमोरील कलेक्शनच्या समस्या आणखी वाढणार आहे.


दीपिका पदुकोणचा 'छपाक' आणि अजय देवगणचा 'तानाजी' यांच्यातही बॉक्सऑफिसवर तगडी स्पर्धा होणार आहे. दोघांचेही सिनेमा एकाच दिवशी म्हणजे 10 जानेवारीला प्रदर्शित होत असल्यानं बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारतं हे पाहणं रजक ठरणार आहे.


सर्वात मोठी स्पर्धा अक्षय कुमार आणि सलमान खानमध्ये असणार आहे. सलमानचा 'राधे' आणि अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' सिनेमा एकाच दिवशी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. सलमानचा 'राधे' 2020 मध्ये ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार असून अक्षयचा 'सूर्यवंशी' सुद्धा त्याच दिवशी प्रदर्शित होईल, अशी चर्चा बॉलिवूडमध्ये आहे.


सध्या बॉलिवूडचं क्यूट कपल म्हणून ओळखले जाणारे रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्यात 2020 मध्ये बॉक्स ऑफिसवर चुरशीची स्पर्धा पाहायला मिळेल. राजामैलींच्या 'RRR'आलिया आणि वरुण धवनला कास्ट करण्यात आलं आहे. हा सिनेमा 30 जुलै 2020ला प्रदर्शित होणार आहे तर दुसरीकडे रणबीर कपूरचा 'शमशेरा' सुद्धा याच दिवशी प्रदर्शित होणार आहे.