हम दिल दे चुके सनम हा बॉलिवूडमधील आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो.
2/ 10
सलमान खान, ऐश्वर्या राय आणि अजय देवगणच्या लव्ह ट्रायांगलमुळं हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.
3/ 10
या चित्रपटाला आता 22 वर्ष उलटून गेली आहेत. या निमित्तानं अजय देवगणनं काही खास फोटो शेअर केले आहेत.
4/ 10
या फोटोंद्वारे अजयनं पुन्हा एकदा आपल्या जुन्या आठवणींना नव्यानं उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे.
5/ 10
22 वर्षांपूर्वी आलेल्या चित्रपटाची क्रेझ आजही पाहायला मिळते. या चित्रपटातील गाणी, डायलॉग्स आजही तरुणवर्ग तितक्याच उत्साहानं ऐकतात.
6/ 10
या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लीला भंन्साळी यांनी केलं होतं. या चित्रपटामुळं ते खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आले होते.
7/ 10
या चित्रपटादम्यान ऐश्वर्या राय सलमान खानला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळं पडद्यामागची लव्ह स्टोरी पडद्यावर झळकली त्यामुळं हा चित्रपट सुपरहिट झाला असेही काही जण म्हणतात.
8/ 10
या चित्रपटातील निबोडा निबोडा, चांद छुपा बादल में आणि ‘हम दिल दे चुके सनम’ ही तीन गाणी तर तुफान गाजली होती.
9/ 10
चित्रपटातील चांद छुपा बादल में या गाण्यासाठी उदित नारायण यांना सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार देखील मिळाला होता.
10/ 10
16 कोटींचं बजेट असणाऱ्या चित्रपटाने तब्बल 52 कोटी रुपायंचा गल्ला बॉक्सऑफिसवर कमावला होता.