अनिल कपूर यांनी आपल्या दोन्ही मुलींची लग्ने केली आहेत. सोनम कपूरनंतर या वर्षी ऑगस्टमध्येच त्यांनी आपली धाकटी मुलगी रिया कपूरचंही लन केलं. रियाने करण बुलानीला आपला साथीदार बनवल आहे. 12 वर्षांच्या नात्याला नवे नाव देत त्यांनी अत्यंत साधेपणाने घरात लग्न केले. लग्नानंतर रियाने तिच्या आलिशान घराची आतील झलक चाहत्यांना दाखवली. जी आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रियाने सांगितले की, मास्टर बेडरूम ही घरातील तिची आवडती खोली आहे, ज्याला तपकिरी रंग देण्यात आला आहे. फोटो शेअर करताना तिने सांगितले की, मला अशी खोली हवी आहे ज्यामध्ये करणला स्वर्ग वाटेल. पण हे पाहून मी सर्व काही विसरते. मनीषा पारेख आणि कविता सिंग यांनी असा सुंदर बेडरूम बनवला आहे, असे तिने सांगितले.