मराठीतील अनेक अभिनेत्रींनी मराठी नंतर आता हिंदी टेलिव्हिझनकडे वाटचाल आहे. तर हिंदीतील छोट्या पडद्यावरही त्यांना चांगली लोकप्रियता मिळताना दिसत आहे. पाहूयात कोण आहेत या अभिनेत्री,
2/ 13
मराठी टेलिव्हीजनवर स्वत:ची ओळख निर्माण केल्यानंतर अभिनेत्री अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) आता कलर्स मराठी वरील 'बावरा दिल; (bawra dil) या मालिकेत काम करत आहे.
3/ 13
अभिज्ञाने मराठीतील लोकप्रिय मालिका 'तुला पाहते रे', 'खुलता कळी खुलेना', 'रंग माझा वेगळा' या मालिकांमध्ये काम केलं आहे.
4/ 13
अभिनेत्री मयुरी देशमुख (Mayuri Deshmukh) ही स्टार प्लस वरील इमली (Imli) या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे.
5/ 13
खुलता कळी खुलेना या लोकप्रिय मराठी मालिकेतून मयुरीला प्रसिद्धी मिळाली होती. तर काही नाटकांतही तिने काम केलं आहे.
6/ 13
अभिनेत्री रेवती लेले (Revati Lele) स्टार प्लसच्या 'आपकी नजरो मे' (Apki Nazro me) या मालिकेत सध्या काम करत आहे.
7/ 13
कलर्स मराठीची लोकप्रिय मालिका स्वामीनी मध्ये तिने रमाबाईंची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती प्रसिद्धीझोतात आली होती.
8/ 13
अभिनेत्री नेहा पेंडसे (Neha Pendse) ही हिंदीतील लोकप्रिय मालिका 'भाभीजी घर पर है' (Bhabiji Ghar Par hai) या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकत आहे.
9/ 13
नेहा याआधीही हिंदीतील मै आय कम इन मॅम या मालिकेत दिसली होती. तर मराठीत भाग्यलक्ष्मी या मालिकेसह अनेक चित्रपटांत ती दिसली होती.
10/ 13
अभिनेत्री श्रुती मराठे (Shruti Marathe) ही स्टार प्लस वरील रुद्रकाल (Rudrakal) या मालिकेत काम करत आहे. त्यात ती एका पोलिसाची भूमिका साकारत आहे.
11/ 13
श्रुतीने मराठीत राधा ही बावरी, जागो मोहन प्यारे या मालिकेंसह काही चित्रपटांत काम केलं आहे.
12/ 13
अभिनेत्री सुखदा खांडकेकर (Sukhada Khandkekar) ही सोनी टिव्ही वरील 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी' (Punyashlok Ahilyadevi) या मालिकेत काम करत आहे.