मिलिंद सोमणवर FIR दाखल झाल्यानंतर व्हायरल होत आहेत हे PHOTOS, बायकोसोबत अभिनेत्याचा रोमँटिक अंदाज
मिलिंद सोमण (Milind Soman) विरोधात Nude फोटोंप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बायको अंकिता कोंवर (Ankita Konwar) बरोबरचे गोवा व्हेकेशनमधील हे फोटो आहेत.


अभिनेता मिलिंद सोमण त्याचा 55वा वाढदिवस कधीच विसरणार नाही. बायकोबरोबर गोवा व्हेकेशन एन्जॉय करतानाच त्याला मोठ्या कायदेशील अडचणीला देखील सामारे जावं लागत आहे. सोशल मीडियावर न्यूड फोटो शेअर केल्यामुळे मिलिंद सोमण विरोधात तक्रार दाखल झाली आहे, मात्र यानंतरही सोशल मीडियावर मिलिंद आणि अंकिताचे काही रोमँटिक फोटो व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य-@ankita_earthy/Instagram)


मिलिंद आणि अंकिता दोघेही फिटनेस फ्रीक आहेत. दोघेही मॅरेथॉन, फिटनेस इव्हेंटमध्ये नेहमी सहभाही होताना दिसतात. सोशल मीडियावर हे कपल नेहमी सक्रीय आहे. (फोटो सौजन्य-@ankita_earthy/Instagram)


मिलिंद सोमण विरोधात त्या वादग्रस्त फोटोमुळे एफआयआर दाखल झाल्यानंतर त्यांचे काही गोवा व्हेकेशनचे फोटो व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये दोघेही एकमेकांबरोबर क्वालिटी टाइम घालवत आहेत. (फोटो सौजन्य-@ankita_earthy/Instagram)


मिलिंद सोमणनं आपल्या वाढदिवशी आपल्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. गोव्यातील एका बीचवर तो नग्नावस्थेत धावतानाचा हा फोटो. याबाबत गोवा सुरक्षा मंचाकडून वास्को पोलिसांत सोमण यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. गोव्यात न्यूड व्हिडीओ शूट केल्यानंतर अभिनेत्री पूनम पांडेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. यानंतर मिलिंद सोमणलाही सोशल मीडियावर ट्रोल केलं जाऊ लागलं. (फोटो सौजन्य-@milindrunning/Instagram)


मिलिंद सोमणचे याआधीही अनेक शर्टलेस फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये त्याची पत्नी अंकिता देखील आहे. अंकिताने त्याच्या वाढदिवशी शुभेच्छा देताना देखील दोघांचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य-@milindrunning/Instagram)


2018 मध्ये मिलिंद आणि अंकिताने एकमेकांशी लग्न केलं. मिलिंद अंकितापेक्षा 25 वर्षांनी मोठा आहे. दोघांचा लग्नसोहळा देखील विशेष चर्चेत होता. लग्नाआधी खूप वर्ष दोघे एकमेकांना डेट करत होते. (फोटो सौजन्य-@ankita_earthy/Instagram)


2020 मे महिन्यात मिलिंद सोमणची आणखी एक पोस्ट वादग्रस्त ठरली होती. मॉडेल मधू सप्रे (Madhu Sapre) बरोबरच्या एका फोटोशूटमधला फोटो मिलिंदने सोशल मीडियावर शेअर केला होता. 25 वर्षांपूर्वीचा हा फोटो तेव्हाही वादग्रस्त ठरला होता, आणि याहीवर्षी हेडलाइन्समध्ये आला होता. (फोटो सौजन्य-@milindrunning/twitter)