‘आणखी किती वजन कमी करु?’ 50 किलो कमी केल्यावरही झरीनला म्हणतात जाडी
अभिनेत्री झरीन खान (Zareen Khan) ही तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळापासूनच कायम चर्चेत राहिली आहे. कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी तिच्या वजनामुळे. वजन कमी करूनही टिका सहन केल्याची खंत तिने व्यक्त केली आहे. पाहा काय म्हणाली झरीन.
|
1/ 11
अभिनेत्री झरीन खान (Zareen Khan) ही तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळापासूनच कायम चर्चेत राहिली आहे. कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी तिच्या वजनामुळे. वजन कमी करूनही टिका सहन केल्याची खंत तिने व्यक्त केली आहे. पाहा काय म्हणाली झरीन.
2/ 11
वीर चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केलल्या झरीनला आधी कॅटरिना कैफ सारखी दिसते म्हणून प्रेश्रकांच्या प्रतिक्रियेला सामोरं जावं लागलं होतं.
3/ 11
नुकतच झरीनने दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या वजनाविषयी काही खुलासे केले आहेत.
4/ 11
युझर्स तिच्या फोटोंवर नेहमीच बॉडीशेमिंगला अनुसरून कमेंट्स करतात यावरही तिने आपलं मत मांडल आहे. काही दिवसांपूर्वी तिने स्ट्रेच मार्क्सचा असलेला एक फोटो पोस्ट केला होता. त्यानंतर तिला या कमेंट्सचा सामना करावा लागला होता.
5/ 11
'कोणत्याही व्यक्तिने अर्झ्यापेक्षा जास्त वजन घटवल्यास असे मार्क्स दिसतात. पण त्यांचे नाही जे फोटोशॉप करतात किंवा सर्जरी करतात', झरीन म्हणाली.
6/ 11
शाळा, कॉलेजच्या दिवसात ती 100 किलो वजनाची होती पण कधीही टिकेला सामोरं जाव लागलं नव्हत असही ती म्हणाली.
7/ 11
पण आता अर्ध वजन घटवल्यानंतरही विशेषतः बॉलिवूड मध्ये आल्यानंतर अशा टिकेला, बॉडिशेंमिंगला सामेरं जाव लागंत असल्याची खंत तिने व्यक्त केली आहे.
8/ 11
बॉलिवूड मध्ये दुटप्पी भूमिका मांडणारे लोक असल्याचही ती म्हणाली.
9/ 11
'लोकांसमोर ते बॉडिशेमिंगला विरोध करतात. पण जेव्हा चित्रपट बनवण्याची वेळ येते तेव्हा ते झिरो फिगर वाली अभिनेत्री शोधतात,' झरीन म्हणाली.
10/ 11
पुढे झरीन म्हणाली 'मी अर्ध वजन घटवलं आहे, चित्रपट मिळवण्यासाठी नाही तर लोकांनी, मीडियाने मला स्वीकाराव म्हणून'.
11/ 11
झरीन नुकतीच 'हम भी अकेले तुम भी अकेले' या चित्रपटात दिसली होती.