अजय देवगणच्या अपकमिंग सिनेमात अभिनेत्री तब्बू प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अजय आणि तब्बू अनेक वर्षांनी या सिनेमाच्या निमित्तानं एकत्र काम करणार आहेत. भोलामधील तब्बूचा फर्स्ट लुक समोर आलाय. पहिल्यांदा नाही तर सलग तिसऱ्यांदा अभिनेत्री तब्बू पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. भोला सिनेमातील तब्बूच्या लुकचं मोशन पोस्टर रिलीज झालंय. आधीच्या सिनेमापेक्षा या सिनेमात तब्बूचा लेडी दबंग लुक सर्वांचं लक्ष वेधतोय. 'एक खाकी, सौ शैतान' म्हणत तब्बूनं पोस्टर शेअर केलंय. यात तब्बूचे पोलिसांच्या वेशातील वेगवेगळे लुक्स पाहायला मिळत आहेत. भोला हा सिनेमा तमिळच्या ब्लॉकबस्टर कैथी सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. कगनराजनं सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. भोला हा सिनेमा एक थरारपट असून एक वडील आपल्या तरुण मुलीपर्यंत पोहोचण्यासाठी वाटेत येणाऱ्या माणसांशी कसे लढतात हे दाखवण्यात येणार आहे. भोला हा सिनेमा 30 मार्च 2023ला रिलीज होणार आहे. या आधी अभिनेत्री तब्बूनं दृश्यम 2 या सिनेमात महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. त्याचप्रमाणे कुत्तेमध्ये देखील तब्बू पोलिसांच्या भूमिकेत दिसली.