अभिनेत्री सोनालीने नुकताच लग्न केलं आहे. आणि लग्नानंतर ही तिची पहिलीच वटपौर्णिमा आहे. मात्र सध्या ती देशातून बाहेर असल्याने तिला वटपौर्णिमा साजरी करता आलेली नाही. मात्र सोनालीने लाल साडीतील आपले सुंदर फोटो शेयर करत म्हटलं आहे, माझी पहिलीच वटपौर्णिमा साजरी करता आली नसली तरी थोडं नटावं म्हटलं. पारंपरिक लाल रंगाच्या जरतारी साडीत सोनाली खुपचं सुंदर दिसत आहे. सोनाली सध्या पूर्व आफ्रिकेत आपलं हनिमून एन्जॉय करत आहे. सोनालीने काही दिवसांपूर्वी कुणाल बेनोडेकरसोबत लग्न केलं आहे. कुणाल हा कामानिमित्त दुबईमध्ये राहतो. सोनालीसुद्धा लग्नानंतर दुबईतच राहात आहे.