अभिनेत्री श्रुती मराठे सध्या तिच्या निरनिराळ्या लुक्समुळे फारच चर्चेत आहे. तर आता तिने साडीतील काही हटके फोटो शेअर केले आहेत. पाहा श्रुतीचा हटके अंदाज 'बार्ड ऑफ ब्लड' नंतर श्रुतीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला होता. तर आता तिचे फोटोही हटके दिसत आहेत. श्रुती 'रुद्रकाल' या हिंदी मालिकेतही सध्या काम करत आहे. त्यात ती पोलिसाच्या भूमिकेत दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालिकेचं शुटींग सध्या बंद आहे. श्रुतीने सध्या तिच्या फिटनेसवर विशेष लक्ष केंद्रीत केलं आहे. गेले काही दिवसांत तिने वजन कमी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तिला अनेक कमेंट्सही मिळत आहेत. श्रुती सोशल मीडियावर तिचे नवनवीन फोटोशुट शेअर करत आहे. श्रुती मराठी व्यतिरिक्त आता हिंदी आणि साउथ इंडस्ट्रीतही सक्रिय पाहायला मिळत आहे.