अभिनेत्री शिल्पा शेट्टी अभिनयाइतकीच तिच्या फिटनेसाठीही प्रसिद्ध आहे. तिने स्वतःला अगदी फिट ठेवलं आहे. पाहा तिचे ग्लॅमरस फोटो. सुदंर शिमरी बॉडीकॉन ड्रेसमध्ये तिची सुंदर फिर दिसून येत आहे. शिल्पाच्या या सौंदर्यावर चाहते तिचं कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाही. तिच्यावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. शिल्पा नेहमीच ग्लॅमरस अवतारात पाहायला मिळते. पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. शिल्पा सध्या सुपर डान्सर्स या शोची जज आहे. शिल्पा शेट्टीचा अपकमिंग चित्रपट ‘हंगामा 2’ 23 जुलैला प्रदर्शित होत आहे. त्यातील तिचा डायन लुक फारच व्हायरल झाला होता. 'हंगामा 2 (Hungama 2)' मधून शिल्पा अनेक वर्षांनंतर चित्रपटांत पुनरागमन करत आहे.