मन उधाण वाऱ्याचे या मालिकेतून पदार्पण करणारी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. शर्मिष्ठानं रेशीमगाठी मालिकेतूनही प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यानंतर बिग बॉसमध्येही ती उत्तम खेळली. स्टार प्रवाहवरील अबोली या मालिकेत शर्मिष्ठा काम करत होती. मात्र नुकतीच तिनं मालिका सोडली. मालिका सोडली असली तरी शर्मिष्ठा आता मालिकेची निर्मिती करताना दिसणार आहे. अभिनेत्रीनं नुकतीच मोठी घोषणा केली आहे. अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत स्वत:चं प्रोडक्शन हाऊस सुरू करत आहे. या प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून ती मराठी मालिकांची निर्मिती करणार आहे. तिच्या या नव्या सुरूवातीत तिला तिचा नवरा तेजस देसाई देखील मदत करणार आहे. शर्मिष्ठाच्या नव्या प्रोडक्शन हाऊसचं नाव अजून ठरायचं आहे. नाव ठरल्यानंतर ती स्वत: सर्वांना ही माहिती देणार आहे. दरम्यान या बातमीनंतर शर्मिष्ठाला सिनेसृष्टी आणि चाहत्यांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत.