अभिनेत्री सारा अली खानने तिच्या पहिल्या प्रेमाबाबत केला खुलासा
सैफ अली खान (Saif Ali Khan) ची मुलगी अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ने सोशल मीडिया (Social Media)वर तिच्या चाहत्यांना तिच्या पहिल्या प्रेमाबाबत सांगितले आहे.
|
1/ 6
सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची लाडकी मुलगी सारा अली खान सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ती नेहमी तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. (फोटो सौजन्य- @saraalikhan95/Instagram)
2/ 6
लॉकडाऊनमध्ये तिने भावाबरोबर मस्ती करताना, वाढदिवस साजरा करताना असे तिच्या आयुष्यातील अनेक क्षण तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. दरम्यान तिने नुकताच तिच्या पहिल्या प्रेमाबाबत खुलासा केला आहे. (फोटो सौजन्य-@saraalikhan95/Instagram)
3/ 6
साराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये याबाबत भाष्य केले आहे. तिने शूटिंगच्या सेटवरील एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये तिने कॅमेराचा फोटो पोस्ट करून त्याला 'पहिलं प्रेम' म्हटलं आहे.
4/ 6
अभिनेत्री कॅमेराचा फोटो पोस्ट करत असे कॅप्शन दिले आहे की- अखेरीस माझ्या पहिल्या प्रेमाकडे परतले. यावेळी तिने हार्ट इमोजी देखील पोस्ट केला आहे. मात्र सारा कोणत्या प्रोजेक्टवर काम करत आहे हे मात्र गुलदस्त्यात आहे (फोटो सौजन्य-@saraalikhan95/Instagram Story)
5/ 6
अभिनेत्री सारा अली खान सिनेमांव्यतिरिक्त तिच्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजासाठी देखील प्रसिद्ध आहे. तिने काही काळातच चाहत्यांना आपलेसे केले आहे. (फोटो सौजन्य-@saraalikhan95/Instagram)
6/ 6
नुकताच साराचा गुलाबी बिकीनीतील फोटो व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर तिने हा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने निळ्या रंगाचे काजळ लावले आहे. तिचा हा लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता. (फोटो सौजन्य-@saraalikhan95/Instagram)