

अभिनेत्री सारा अली खानने (Sara Ali Khan) सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमधून साराने स्टेजवर पोझ कशा द्यायच्या याचं गंमतीदार सिक्रेट शेअर केलं आहे. या फोटोला तिने स्टेज ऑफ पोझिंग असं नाव दिलं आहे. वरुण धवन (Varun Dhawan) आणि सारा अली खान त्यांच्या कुली नंबर 1 सिनेमामुळे चर्चेत आले आहेत. गोविंदाच्या कुली नंबर1 चा सिक्वेल असेल.


आता या चित्रपटामध्ये सारा आणि वरुण जादू दाखवणार की आधीचाच सिनेमा सरस ठरणार हे पाहणं महत्वाचं आहे.


वरुण धवन आणि सारा अली खानचा कुली नंबर 1 हा सिनेमा 25 डिसेंबर रोजी amazon prime या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.


कुली नंबर 1 नंतर सारा अतरंगी रे या चित्रपटामध्ये झळकणार आहे. या सिनेमामध्ये ती अक्षय कुमार आणि धनुषसोबत दिसणार आहे.


काही दिवसांपूर्वी सारा अली खान ड्रग केसमध्ये अडकली होती. त्यानंतर तिला सोशल मीडियावर तिला बरंच ट्रोल करण्यात आलं होतं. त्यामुळे ती काही दिवस सोशल मीडियापासून लांबच होती.