मीडिया रिपोर्टनुसार शाहरुख खान सध्या एका अॅक्शन फिल्मवर काम करत आहे. या चित्रपटातील एका भूमिकेसाठी समंथाला विचारणा करण्यात आली होती. या चित्रपटाचं अजून कोणतेही नाव ठरवण्यात आलेलं नाही.
2/ 6
शाहरुख खानसोबत काम करण्यासाठी समंथाला विचारण्यात आलं होतं. परंतु तिने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. त्यासाठी तिने वैयक्तिक कारण असल्याचं सांगितलं.
3/ 6
समंथा ही वेब सीरिज द फॅमिली मॅन 2 मध्ये दिसली होती. त्यात तिच्या अभिनयाचं फार कौतुक करण्यात आलं होतं. दक्षिणेतील सिनेसृष्टीत मोठं यश मिळवल्यानंतर आता ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
4/ 6
नागा चैतन्यपासून वेगळी झाल्यामुळे समंथा चर्चेत आहे. आता ती लवकरच तिच्या पहिल्या बॉलिवूड चित्रपटाची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
5/ 6
शाहरूखसोबतच्या चित्रपटाला समंथाने नकार दिल्यानंतर नयनताराला चित्रपटासाठी विचारणा करण्यात आली तेव्हा तिने होकार दिला. सध्या या चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. ती सध्या शाहरुख खानशिवाय मुंबईत चित्रपटाचे शूटिंग करत आहे.
6/ 6
समंथा आणि नागा चैतन्य यांचा घटस्फोट झाला असून ते आता वेगळं राहत आहे. तिच्या या निर्णयामुळं तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलदेखील करण्यात आलं होतं. त्यावेळी तिने ट्रोलर्सना खडे बोल सुनावले होते.