दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा प्रभू नेहमीच आपल्या स्टाईल आणि लुकमुळे चर्चेत असते. समंथाचा फॅशन सेन्स अनेकांना पसंत पडतो. अनेक तरुणी तिचा फॅशन फॉलो करतात. नुकतंच समंथाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री फारच ग्लॅमरस दिसत आहे. समंथाने ग्रीन कलरचा वेस्टर्न सिल्क गाऊन परिधान केला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर फोटो शेअर करताच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. समंथाच्या या फोटोंवर चाहते तर कमेंट्स करतच आहेत शिवाय तिचे कलाकार मित्रसुद्धा कमेंट्स करत आहेत. अभिनेत्रीच्या या पोस्टवर नॅशनल क्रश रश्मिका मंदनाने कमेंट् करत फायर इमोजी शेअर केला आहे. तर दुसरीकडे त्याच्या डिझायनर मित्रानेही कमेंट केली आहे. सोबतच कबड्डी स्टार राहुल चौधरीनेसुद्धा फायर इमोजी कमेंट केली आहे.