

बॉलिवूड कलाकारांसाठी अभिनय येणं जेवढं गरजेचं आहे तेवढंच किंबहूना त्याहून कणभर जास्त गरजेचं स्टायलिश आणि ट्रेण्डी राहणं आहे. बी-टाऊनमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना स्टाइल दीवाचा टॅग मिळाला आहे. तर काही या शर्यतीत स्वतःला टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.


अभिनेत्री जे कपडे घालतात तो ट्रेण्ड होऊन जातो. पण सध्या या झगमगत्या दुनियेत एक वेगळाच ट्रेण्ड सुरू आहे. या नव्या ट्रेण्डचं नाव आहे ‘वन शोल्डर ड्रेस.’ हा ट्रेण्ड बॉलिवूडमध्ये अनेक दिवसांपासून सुरू आहे, मात्र सध्या या ट्रेण्डने पुन्हा एकदा जोर धरला आहे.


सोनम कपूर फार आधीपासून हा ट्रेण्ड फॉलो करतेय. नेहमीप्रमाणे या ट्रेण्डची ती राणीच आहे. वन शोल्डर ड्रेसमध्ये सोनम फारच स्टायलिश दिसतेय. बॉलिवूडची स्टाइल दीवा कोण असा प्रश्न जर कोणाला विचारला तर पहिलं नाव सोनमचं घेतलं जातं. एअरपोर्टपासून रेड कार्पेटपर्यंत सगळीकडेच तिचा स्टायलिश अवतार दिसतो.


दीपिका पदुकोणने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये वन शोल्डर ड्रेसचा ट्रेण्ड फॉलो करताना दिसते. हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती फार मादक दिसत असते.


अभिनेत्री मलायका अरोरा या लाल रंगाच्या वन शोल्डरमध्ये फारच बोल्ड दिसतेय. मलायका तिच्या सेक्सी फिगरसाठी आणि स्टाइल सेन्ससाठी ओळखली जाते.


सिनेमांपेक्षा आपल्या बोल्ड फोटोशूटमुळे लक्षात राहणारी अभिनेत्री ईशा गुप्ताही हा ट्रेण्ड फॉलो करताना दिसते. ईशा सिनेमांत येण्यापूर्वी मॉडेल होती.