बाहुबली 'प्रभास' आणि निहारिकाच्या अफेअरबाबत चर्चांना उधाण,अभिनेत्रीने केला हा खुलासा
अभिनेता प्रभासचं नाव तसं अनेक अभिनेत्रींबरोबर जोडलं जातं. अनुष्का आणि त्याच्या अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्यानंतर आता त्याचं नाव आणखी एका अभिनेत्रीबरोबर घेतलं जात आहे. जाणून घ्या कोण आहे ही अभिनेत्री
बाहुबली 'प्रभास'च्या लग्नाची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचं नाव देखील आजपर्यंत अनेक अभिनेत्रींबरोबर जोडलं गेलं आहे
2/ 9
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अनुष्का आणि प्रभासचं अफेअर असल्याच्या चर्चा होत्या. मात्र दोघांनीही नाकारल्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
3/ 9
दरम्यान सध्या प्रभासबरोबर आणखी एका अभिनेत्रीचं नाव जोडलं जात आहे. ते दोघं लग्न करणार असल्याच्या चर्चा ही रंगल्या आहेत
4/ 9
तर सध्या अभिनेत्री निहारिका कोनिडेला बरोबर प्रभास रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून होत्या. मात्र पुन्हा एकदा प्रभासबरोबर कोणाचं तरी नाव जोडलं गेलं आहे आणि पुन्हा एकदा त्याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
5/ 9
अभिनेत्री निहारिका कोनिडेलाने या अफवा असल्याचे मीडियासमोर स्पष्ट केलं आहे
6/ 9
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये निहारीकाने या सर्व निराधार असल्याचं म्हटलं आहे. या अफवांवर चाहत्यांनी विश्वास ठेवू नये असं आवाहन तिने केले आहे
7/ 9
निहारिका सुुपरस्टार चिरंजीवी आणि पवन कल्याण यांची भाची आहे. ती स्वत: एक अभिनेत्री देखील आहे. सध्या प्रभासबरोबर तिचं नाव जोडलं गेल्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (सौजन्य- mirchi9)
8/ 9
सुपरस्टार रामचरण आणि अल्लू अर्जून सुद्धा निहारिकाचे भाऊ (Cousin) लागतात