

दाक्षिणात्य सुपरस्टार आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर प्रभुदेवाचा आज 46 वा वाढदिवस. त्याला भारतातला मायकल जॅक्सन म्हटलं जातं. प्रभुदेवाला लहानपणापासूनच नाचण्याची आवड होती. त्याचे वडिलही दक्षिणेतले प्रसिद्ध कोरिओग्राफर होते.


सध्या तो ‘दबंग ३’ सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. इंदौरमध्ये या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. पण आज आपण त्याच्या सिनेमांबद्दल आणि नाचाबद्दल नाही तर प्रभुदेवाच्या लव्ह लाइफबद्दल बोलणार आहोत. प्रभुची ती लव्हस्टोरी जी कधीच पूर्ण होऊ शकली नाही.


दाक्षिणात्य सिनेअभिनेत्री नयनतारा ही तिथली सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या नावावरच अनेक सिनेमे सुपरहिट होतात. एकवेळ अशी होती की नयनतारा आणि प्रभुदेवा यांच्या लव्हस्टोरीने वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरायचे.


दोघांनी अनेक वर्ष एकमेकांना डेटही केलं. यानंतर नयनताराने प्रभुला लग्नाबद्दल विचारलं. लग्न न करण्याचं प्रभुदेवाचं ठोस कारण होतं.


नयनताराने प्रभुदेवाशी लग्न करण्यासाठी धर्मही बदलला होता. पण त्याचाही फारसा उपयोग झाला नाही. यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे प्रभुदेवाचं आधीच लग्न झालं होतं.


प्रभुदेवाने १९९५ मध्ये लग्न केलं होतं. पहिलं लग्न झालेलं असतानाही त्याला नयनताराशी लग्न करायचं होतं. पण त्याची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.