छोट्या पडद्याची प्रसिद्ध नागीन म्हणून ओळख असणारी अभिनेत्री मौनी रॉयने पारंपरिक वेशात साऱ्याचंच लक्ष वेधलं आहे. पांढऱ्या रंगाच्या लेहंगा चोळीत ती फारच सुंदर दिसत आहे. पारंपरिक राजस्थानी लुकमध्ये मौनी फारच आकर्षक दिसत आहे. छोट्या पडद्यापासून आपल्या करिअरची सुरुवात केलेल्या मौनीची आता बॉलिवूडमध्येही मोठी ओळख निर्माण झाली आहे. तिचा मोठा चाहता वर्ग ही आहे. मौनीचे रिफ्रेशींग लुक्स सोशल मीडियावर नेहमीच हिट ठरतात. मौनीने गोल्ड, केजिएफ, मेड इन चायना या चित्रपटांत काम केलं आहे. लवकरच ती ब्रम्हास्त्र चित्रपटात दिसणार आहे. मौनीची सोशल मीडियावरही मोठी फॅनफॉलोइंग आहे.