अभिनेत्री मिताली मयेकर सध्या सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. तिचे भटकंतीचे फोटो सध्या सोशल मीडियावर दिसत आहेत. पाहा मितालीचे फोटो. पण यावेळी मिताली मात्र एकटीच फिरताना दिसत आहे. तिच्यासोबत पती सिद्धार्थ चांदेकर दिसत नाही. मिताली सुंदर निसर्गाचा आनंद घेताना दिसत आहे. मिताली सध्या हिमाचल प्रदेशात भटकंती करत आहे. तेथील सुंदर निसर्गात ती रममान झाली आहे. मितालीच्या या फोटोंमध्ये कोठेही सिद्धार्थ दिसत नाही. मिताली सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह असते. तिच्या अनेक अपडेट्स ती सोशल मीडियावर देत असते. जानेवारी महिन्यात सिद्धार्थ आणि मितालीने लग्न केलं होतं. मितालीची सोशल मीडियावर मोठी फॅनफॉलोइंगही आहे.