

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिचे काही व्हिडिओ आणि फोटो आजकाल खूप व्हायरल होत आहेत. अलीकडेच तिच्या डान्स रियलिटी शो 'इंडियाज बेस्ट डान्सर' चा भव्य ग्रँड फिनाले झाला, ज्यामध्ये 'टायगर पॉप'अजय सिंह (Ajay Singh) विजयी झाला. आता मलायका अरोरा क्रिकेट खेळतानाचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती आपला मुलगा अरहानबरोबर क्रिकेट खेळताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये मलायका फलंदाजी करताना दिसते.


अरहानने मलायकासाठी गोलंदाजी केली. पण, मलायकाने शॉट मारण्याचा प्रयत्न करत असतानाच तिच्या कुत्र्याने बॉल पकडला.


. यानंतर मलायकाने दुसरा चेंडू आणला आणि परत खेळायला सुरुवात केली. तिने अरहानसाठी गोलंदाजी केली आणि अरहान फलंदाजी करताना दिसला.


मलायका नेहमीच फोटो आणि व्हिडिओंमधून चर्चेत राहते. या व्हिडीओंवर तिच्या चाहत्यांनी भन्नाट कॉमेंट्स केल्या आहेत.


मलायका अनेकदा आपल्या मोहक अदा आणि फिटनेसमुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते. 46 व्या वर्षीही मलायका 25 वर्षाच्या तरुणीला लाजवेल इतकी सुंदर दिसते.