क्रांती रेडकर दिग्दर्शित 'रेनबो'च्या शुटींगला सुरुवात! 'हे' कलाकार मुख्य भूमिकेत
सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असलेली अभिनेत्री क्रांती रेडकर ( Kranti Rekdar New Film Rainbow) तिच्या नव्या सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. काकणच्या यशानंतर क्रांती रेडकर दिग्दर्शिक रेनबो हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमाचं शुटींग लंडनमध्ये सुरू झालं असून मराठीतील आघाडीचे कलाकार सिनेमात दिसणार आहेत.
|
1/ 9
काकण सिनेमाच्या यशानंतर अभिनेत्री क्रांती रेडकर दिग्दर्शित 'रेनबो' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाच्या शुटींगला नुकतीच सुरुवात झाली आहे.
2/ 9
लंडनमध्ये सिनेमाच्या शुटींगचा श्रीगणेशा करण्यात आला आहे. क्रांतीनं तिच्या सोशल मीडियावर शुटींगचे काही व्हिडीओ शेअर केले आहेत.
3/ 9
क्रांतीनं दिग्दर्शित केलेला हा तिचा दुसरा सिनेमा आहे. क्रांतीनं याआधी 'काकण' या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. ज्यात अभिनेत्री उर्मिला कोठारे आणि जितेंद्र जोशी मुख्य भूमिकेत होते.
4/ 9
एकीकडे लंडनमध्ये रेनबो सिनेमाच्या शुटींगला सुरुवात झाली आहे तर दुसरीकडे सोशल मीडियावर सिनेमातील कलाकारांची नावं देखील समोर आली आहेत.
5/ 9
या सिनेमात शरद केळकर, सोनाली कुलकर्णी, उर्मिला कोठारे आणि ऋषी सक्सेना यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
6/ 9
'रेनबो' म्हणजे अनेक रंगांचे प्रतीक आणि त्यामुळेच या सिनेमात देखील आपल्याला विविध रंग पाहायला मिळणार आहेत.
7/ 9
आजच्या काळात नात्यांमध्ये येणाऱ्या विविध रंगांचा प्रवास यात पाहायला मिळणार आहे.
8/ 9
'रेनबो' हे नावच कलरफुल आहे. या नावातच सारे रंग भरलेले आहेत. नात्यातील हाच सप्तरंगी प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असे क्रांती रेडकरनं म्हटलं आहे.
9/ 9
'रेनबो' हा असा सिनेमा आहे, जो नात्यातील काही संवेदनशील गोष्टी समोर आणणार आहे. या सिनेमाची कथा मनाला भावणारी आहे.