स्टार प्रवाहवरील सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत सध्या ट्विस्ट आला आहे.
2/ 9
मालिकेत पशाचा अपघात होऊन त्याच्या मृत्यू दाखवण्यात आला होता. मात्र नशिबानं तो वाचतो.
3/ 9
इकडे मोरे कुटुंबाला पशाच्या मृत्यूनंतर त्याच्या इन्श्युरन्सचे पैसे मिळातात आणि त्याच वेळेस पशा घरी परत येतो. पण आपल्यामुळे कुटुंबाला पैसे मिळाले आहेत हे पाहून तो लपून बसतो.
4/ 9
आता घरच्यांपासून लपून छपून पश्या आणि अंजीला भेटावं लागतं. अंजी आणि पशाची जोडी प्रेक्षकांमध्येही हिट झाली आहे. पण मालिकेत आता नवी अंजी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
5/ 9
मालिकेच्या येत्या भागात अंजी होळी खेळण्यासाठी पश्याला भेटायला जाते. अंजी बाहेर गेल्यानंतर आता घरात नवी अंजी येणार आहे.
6/ 9
अंजी गुड्डीला तिची साडी नेसून घरात पाठवते आणि स्वत: पश्याला भेटण्यासाठी घराबाहेर पडते.
7/ 9
आता काही भागात गुड्डीच अंजी म्हणून मालिकेत दिसणार आहे.
8/ 9
अंजीचा वेश गुड्डीवरही चांगलाच जमून आला आहे.
9/ 9
मालिकेत अंजीची भूमिका अभिनेत्री कोमल कुंभारनं साकारली आहे. तर पश्याची भूमिका अभिनेता आकाश नलावडे साकारत आहे. खेळकर आणि कणखर आवाज असलेल्या गुड्डीच्या भूमिकेत अभिनेत्री भाग्यश्री पवार आहे.