बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने पुन्हा एकदा टॉपलेस फोटोशूट करत साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. पाहा कियारांचे हटके फोटो. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम) कियारा अडवाणीने सोलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी फोटोशूट केलं आहे. तिच्या या टॉपलेस फोटोशूटमध्ये ती अतिशय बोल्ड दिसत आहे. कियारा फोटोशूट पाहून तिच्या चाहत्यांनी तिला अनेक कमेंट्स दिल्या आहेत. अनेक सेलिब्रिटींनी डब्बूच्या कॅलेंडरसाठी फोटोशूट केलं आहे. मागील वर्षीही कियाराने टॉपलेस फोटोशूट डब्बूच्या कॅलेंडरसाठी केलं होतं. कियारा नेहमीच हटके लुक्सने चर्चेत असते. कियारा मालदीवमध्ये आनंद घेताना दिसत आहे. कियारा लवकरच अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सोबत शेरशाह चित्रपटात दिसणार आहे. कबीर सिंग चित्रपटातून प्रसिद्धी मिळवणारी कियारा आता अनेक चित्रपटांत दिसणार आहे. तिच्या हातात सध्या अनेक चित्रपट आहेत. 'भूल भुलैया 2', 'जुग जुग जियो', 'मिस्टर लेले' या चित्रपटांतही ती दिसणार आहे. सोशल मीडियावरही तिची मोठी फॅनफॉलोइंग आहे.