पुढचं पाऊल या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोतलेली अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. पुढचं पाऊल मालिकेत जुईनं साकारलेली कल्याणी प्रेक्षकांना आवडली. आजही या पात्राची प्रेक्षक आठवण काढत असतात. पुढचं पाऊल नंतर सरस्वती, वर्तुळ, बिग बॉस मराठी आणि आता ठरलं तर मग या मालिकेतून जुई गडकरी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ठरलं तर मग मालिकेत जुई सायली हे पात्र साकारत असून मालिकेत सायली आणि अर्जुनचं लग्न आहे. जुईचं मालिकेतील हे कितवं लग्न आहे असा प्रश्न तिला एका मुलाखतीत विचारण्यात आला. त्याचं जुईनं फार मजेशीर उत्तर दिलं. जुई म्हणाली, 'मी आता लग्न करण्यात पटाईत झाली आहे'. '2 फेब्रुवारी ही तारीख माझ्यासाठी स्पेशल आहे. कारण या दिवशी माझी लग्न होतात'. '2 फेब्रुवारी 2014 ला जुईचं पुढचं पाऊल मालिकेतील कल्याणीचं दुसरं लग्न झालं होतं'. '2 फेब्रुवारी 2019 ला माझं वर्तुळ मालिकेतील लग्न झालं होतं'. 'आणि 2 फेब्रुवारी 2023ला जुईचं म्हणजेच ठरलं तर मग मालिकेतील सायलीचं लग्न झालं', असं जुई म्हणाली. आतापर्यंत जुईनं अनेक मालिकांमध्ये काम केलंय. अनेक मालिकांमध्ये तिची लग्न झालीत. जुईनं वैयक्तिक आयुष्यात अजून लग्न केलं नसलं तरी ऑनस्क्रिन तिनं तब्बल 10 वेळा लग्न केलं आहे.