बॉलिवूडची नवतारका जान्हवी कपूरने (Janhavi Kapoor) लेट्स्ट फोटोशूटने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पाहा अभिनेत्रीचे मनमोहक लूक्स. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम) ELLE India या मॅगझिनसाठी तिने हे शुट केलं आहे. या मॅगझिनच्या जून महिन्याच्या कव्हर पेजवर जान्हवी झळकली आहे. गोल्डन रंगाच्या लेहेंग्यात ती अतिशय स्वप्नवत दिसत आहे. जान्हवी तिच्या फोटोंनी नेहमीच लक्ष वेधून घेते. हेव्ही ज्वेलरी आणि लाइट मेकअप मध्ये जान्हवी आकर्षक दिसत आहे. न्युड कलर ड्रेस मध्ये जान्हवी सुंदर दिसत आहे. जान्हवी सध्या तिच्या काही आगामी चित्रपटांमध्येही व्यस्त आहे. हटके पोझ देताना जान्हवी दिसत आहे. अभिनयाव्यतिरिक्त जान्हवी उत्तम चित्रकार देखील आहे. काही दिवसांपूर्वी तिने स्वतः हाताने काढलेली काही चित्रे पोस्ट केली होती. हाय स्लिट ड्रेस मध्ये जान्हवी आकर्षक दिसत आहे. जान्हवी सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते. तिची मोठी फॅनफॉलोइंग आहे. जान्हवी लवकरच एका मल्याळम चित्रपटाच्या रिमेक मध्येही दिसणार आहे.