अभिनेत्री नोरा फतेही नेहमीच तिच्या लुक्सनी साऱ्यांच लक्ष वेधते. लाल रंगाच्या ड्रेसमध्ये ती अतिशय आकर्षक दिसत आहे. पाहा तिचे फोटो. ऑफशोल्डर ड्रेसमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. नोराचे लाल रंगाच्या ड्रेसमधील हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. तिच्यावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. अनेक सेलिब्रीटींनीही तिचं कौतुक केलं आहे. नोरा लवकरच भूज- द प्राईड ऑफ इंडिया या चित्रपटात दिसणार आहे. त्यातील तिचं एक गाणही लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याच्या टीझरने प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये नोराची सशक्त भूमिका पाहायला मिळत आहे. नोरा चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान जखमी झाली होती. त्याचे फोचोही व्हायरल झाले होते. नोरा तिच्या डान्ससाठी फारच प्रसिद्ध आहे मात्र आता तिला चित्रपटांतही भूमिका मिळत आहेत. नोरा सध्या बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असणारी प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.