सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी (Sushant Singh Rajput) रिया चक्रवर्तीने (Rhea Chakraborty) दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाने सर्वात मोठा निर्णय दिला आहे. हे प्रकरण आता सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. सीबीआय चौकशीचे आदेश कोर्टाने दिले आहेत. महाराष्ट्र शासनाने त्यांचे पालन केले पाहिजे आणि मदत केलीच पाहिजे, असे आदेश देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
सुनावणी करणरे न्यायाधीश ऋषिकेश रॉय यांनी सर्व पक्षांचे युक्तिवाद संक्षिप्त लिखित नोट स्वरूपात 13 ऑगस्टपर्यंत जमा करण्यास परवानगी दिली होती. सर्व पक्षांनी 13 ऑगस्टपर्यंत जबाब दाखल केला होता. ज्यावर न्यायालयाने आज निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज 35 पानांचा निकाल जाहीर करत तपास सीबीआय करेल असे आदेश दिले आहेत.