टेलिव्हिजन अभिनेत्री अनिता हसनंदानी (Anita Hassanandani) प्रेग्नेंट असल्यामुळे तिचे चाहते याबाबत खूप उत्सुक आहेत. सध्या ती तिच्या कुटुंबाबरोबर क्वालिटी टाइम घालवत आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर देखील ती सक्रीय आहे. दरम्यान तिने खुलासा केला आहे की, नागिन 4च्या सेटवर ती प्रेग्नेंट होती. तिने Baby Bump असणारा नागिन 4 च्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. (Photo Credit- @anitahassanandani/Instagram)
अनिताने एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून तिच्या प्रेग्नन्सीची बातमी दिली होती. तिने नवरा रोहित रेड्डीबरोबरचा व्हिडीओ शेअऱ केला होता. काही सेकंदात त्यांनी त्यांची लव्हस्टोरी सांगितली होती. तिने या व्हिडीओमध्ये तिचा क्यूट बेबी बंप देखील फ्लाँट केला आहे. (Photo Credit- @anitahassanandani/Instagram)