छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अमृता देशमुख तिच्या लेटेस्ट फोटोशूचमध्ये अतिशय मनमोहक दिसत आहे. पाहा तिचे सुंदर फोटो. अमृता सुंदर मराठमोळ्या रुपात अगदी मनमोहक दिसत आहे. सुंदर पैठणी आणि नथ यात अमृता अगदी खुलून दिसत आहे. फ्रेशर्स या झी युवाच्या मालिकेतून अमृताला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. त्यातील तिची रंजक भूमिका प्रेक्षकांना फारच आवडली होती. तुमचं आमचं सेम असतं, देवा शप्पथ या मालिकांमध्येही अमृता झळकली होती. याशिवाय स्वीटी सातारकर या चित्रपटातही ती दिसली होती. डिझायनर साडीत अमृता फारच संदर दिसत आहे. अमृता सोशल मीडियावप फार सक्रीय असते. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो ती शेअर करत असते. अमृताला तिच्या स्वीटी सातारकर चित्रपटासाठी पुरस्कारही मिळाला होता. पिवळ्या रंगाच्या साडीत ती अतिशय सुंदर दिसत आहे.