बॉलिवूडची नव तारका अलाया एफ (Alaya Furniturwalla) सध्या फारच चर्चेत आहे. तिच्या लूकने तिने कमी काळातच चाहत्यांचं मन जिंकलं आहे. पाहा अलायाचे खास फोटो. अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी अलाया तिच्या सुंदर लुक मुळे फारच चर्चेत आहे. लाल रंगाच्या लेहेंग्यामध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. अलायाने मागील वर्षी जवानी जानेमन या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केलं होत. पहिल्याच चित्रपटासाठी अलायाने फिल्मफेअर पुरस्कार देखिल पटकावला होता. अलाया सोशल मीडियावर फार सक्रिय असते. अलाया फिटनेस फ्रिक आहे. ती नियमित योगा करते. अल्पावधीतच अलायाने मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.