छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री अभिज्ञा भावे तिच्या लुक्समुळे नेहमीच चर्चेत असते. सुदंर साडीतील लुक तिने शेअर केले आहे. पाहा तिचे फाेटो. सुंदर साडीतील फोटो तिने शेअर केले आहेत. त्यावर तिला अनेक कमेंट्स मिळाल्या आहेत. अभिज्ञाने या फोटोंना सुंदर कॅप्शनही दिलं आहे. 'ए सुकून छीनने वालो, मन ही मन अपने लिये सुकून क्यो मांगते हो?' असं कॅप्शन तिने फोटोंना दिलं होतं. यावर अभिनेता सौरभ गोखलेने कमेंट करत लिहिलं आहे की, 'सुकून गेलीयेस अगदी ' यावर अभिनेत्री श्रेया बुगडे आणि अभिज्ञा दोघींनीही रिप्लाय दिला आहे. श्रेयाने हसण्याचे इमोजी लिहिले तर अभिज्ञाने 'अरे हलकट माणसा' असं लिहिलं. अभिज्ञा आणि सौरभ दोघेही चांगले मित्र आहेत. त्यामुळे अभिज्ञाच्या कॅप्शनची त्याने चांगलीच फिरकी घेतली होती. साडीत अभिज्ञा फारच सुंदर दिसत आहे.