श्री समर्थ रामदास स्वामी यांची जीवनगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. 'रघुवीर' या सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. रामदास स्वामींच्या भूमिकेचा पहिली लुक पोस्टरमधून पाहायला मिळालाय. सिनेमात प्रसिद्ध अभिनेता रामदार स्वामींची भूमिका साकारणार आहे. उंच माझा झोका या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता विक्रम गायकवाड श्री रामदास स्वामींची भूमिका साकारणार आहे. अभिनेता विक्रमनं सिनेमाचं पहिलं पोस्टर त्याच्या सोशल मीडियावर अकाऊंटवरून शेअर केलंय. सिनेमाची रिलीज डेट लवकरच समोर येईल. विक्रमचा हा पहिलाच अध्यात्मिक सिनेमा असणार आहे. याआधी त्यानं, फक्तेशिकस्त, पावनखिंड सारख्या सिनेमात काम केलं आहे. लवकरच तो सुभेदार सिनेमा दिसणार आहे. अथांग या वेब सीरिजमध्ये त्यानं नानासाहेब ही निगेटिव्ह भूमिका उत्तमरित्या वठवली होती. विक्रम सध्या सोनी मराठीवरील 'छोट्या बयोची मोठी स्वप्न' या मालिकेत काम करत आहे.