सदाबहार अभिनेते देव आनंद यांची आज 12वी पुण्यतिथी आहे. आज देव आनंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांची लव्हस्टोरीविषयी जाणून घेऊया. देव आनंद हे हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील पहिले अभिनेते होते ज्यांची मुलींमध्ये खूप जास्त फॅन फॉलोविंग होती. देव आनंद चित्रपटांसोबतच त्यांच्या राहणीमानासाठीही ओळखले जायचे. त्याच्या काळातील सर्वात सुंदर अभिनेत्री सुरैयासोबत त्यांचे अफेअर होते. मात्र त्यांच्यासोबत अभिनेत्याचं लग्न होऊ शकलं नाही. देव आनंदने त्याची सहअभिनेत्री कल्पना कार्तिकशी लग्न केले. तेही चित्रपटाच्या सेटवर. मात्र त्यांचं हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. देव आनंदचे नाव झीनत अमानसोबतही जोडले गेले होते. आयुष्यात अनेक सुंदर अभिनेत्री आल्या, पण शेवटी ते एकटेच राहिले. देव आनंद यांचे 3 डिसेंबर 2011 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 88 व्या वर्षी लंडनमध्ये निधन झाले.