अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) याने नवीन वर्षाच्या निमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे. अर्जुनने या पोस्टमध्ये ड्रग्स प्रकरणात NCB ने केलेल्या चौकशीबाबत हिंट देत चाहत्यांना स्पष्टीकरण दिलं आहे. अर्जुनने या पोस्टमध्ये लिहिलं की, त्याने कधीच कोणता कायदा तोडला नाही. त्यांनी काही फोटोंच्या माध्यमातून 2020 या वर्षाने दिलेल्या शिकवणीबाबत लिहिलं आहे. (Photo Credit- @rampal72/Instagram)
अर्जुन रामपालने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, आपण 2021 मध्ये आलोय. गेलं वर्ष अनेक अर्थाने चढ-उताराचा होतं. या चिंतेमुळेच माझे विचार लिहिण्यास भाग पाडले. ज्यामुळे कोट्यवधी लोकांना भीती, चिंता, विघटन, घोटाळे, ढोंगीपणा, सत्य, समज, शहाणपणा, शौर्य, पराक्रम, धैर्य, प्रेम, गोंधळ, स्पष्टता आणि चारित्र्याने या भावनांनी भरलेलं होतं. यापैकी बर्याच भावना मी स्वत: अनुभवल्या आहेत. (Photo Credit- @rampal72/Instagram)
अर्जुन रामपालने कुटुंबाबात लिहिलं की, अनेकदा आपण नात्यांना ग्रान्टेंड घेतो. त्याने आपल्या कुटुंबाचे आणि मित्रपरिवाराचे आभार व्यक्त केले. त्याने पुढे लिहिलं की, मला वाटतं 2020 माझ्या आयुष्यातील बिझी वर्ष असेल. माझ्या 280 दिवसांच्या तारखा आधीच बुक होत्या. मला वाटलं हे वर्ष खूप लवकर निघून जाईल. मात्र असं झालं नाही. (Photo Credit- @rampal72/Instagram)
चाहत्यांबाबत त्याने लिहिलं की, सोशल मीडिया नक्कीच एक वरदान आहे कारण यामुळे चाहत्यांसोबत जोडता येतं. मात्र 2020 मध्येही बाबही पुढे आली की ज्यामध्ये सोशल मीडिया धोकादायकही ठरू शकतो. अर्जुनने चाहत्यांना पुढे म्हटलं की, त्याने कायदा तोडला नाही. तुम्हाला घाबरण्याची आणि माझ्याबाबत अंदाज लावण्याची गरज नाही. मी काहीच चुकीचं केलेलं नाही. (Photo Credit- @rampal72/Instagram)