'इतर कोणी काय करावे हे...'; अक्षय कुमारच्या शिवाजी महाराजांच्या भूमिकेवर अमोल कोल्हेंची पहिली प्रतिक्रिया
वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमात अभिनेता अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. यावरून अक्षयला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. अनेकवेळा महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते अमोल कोल्हे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
वेडात मराठे वीर दौंडले सात या सिनेमात अभिनेता अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.
2/ 10
अक्षय कुमारला शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहून प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
3/ 10
शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असेलेल्या अक्षय कुमारवर अनेक स्तरातून टीका करण्यात येत आहे. सध्या हे प्रकरण चांगलंच चर्चेत आहे.
4/ 10
अशातच अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी एबीपी माझीशी बोलताना यावर प्रतिक्रिया देत आपलं मत मांडलं आहे.
5/ 10
अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे की, 'मी गेली 14-15 वर्ष अभिनय क्षेत्रात काम करत आहे. अनेकदा मला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याचं भाग्य लाभलं'.
6/ 10
'महाराजांची भूमिका करणं हे एखाद्या कलाकाराठी ड्रिम रोल असू शकतो. एखाद्या अभिनेत्याला केवळ भूमिका महत्त्वाची असू शकते', असं ते म्हणाले.
7/ 10
तसंच अमोल कोल्हे पुढे म्हणाले, 'महाराजांची भूमिका साकारण्यासाठी माझ्यासाठी शारीरिक आणि मानसिक तयारी करून समोरं जाणं गरजेचं असतं'.
8/ 10
'महाराजांची भूमिका ही नैतिक जबाबदारी आहे हे मी स्वत: समजतो. इतर कोणी काय करावे हे मोठ्या अभिनेत्याला मी सांगू शकत नाही', असं अमोल कोल्हेंनी सांगितलं.
9/ 10
अभिनेते अमोल कोल्हे यांनी आजवर अनेकवेळा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. राजा शिवछत्रपती या मराठी मालिकेत त्यांनी साकारलेले महाराज घराघरात प्रसिद्ध झाले.
10/ 10
अमोल कोल्हे यांचा नुकताच शिवप्रताप गरूड झेप हा सिनेमा प्रदर्शित झाला. ज्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती.