'डोळं नाही थार्याला…' प्राजक्ता माळीच्या फोटोशूटपेक्षा कॅप्शनं वेधलं लक्ष!
प्राजक्ता माळी नेहमीच तिच्या हटके फोटोशूटनं चाहत्यांचे लक्षवेधून घेत असते. नुकतचं तिनं एक फोटोशूट केलं आहे. मात्र तिच्या फोटोशूटपेक्षा तिच्या कॅप्शननं सर्वांचे लक्ष वेधलं आहे.
|
1/ 11
प्राजक्तानं नुकतचं एक फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटपेक्षा तिच्या कॅप्शनची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे.
2/ 11
प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.
3/ 11
प्राजक्तानं तिचे काही सुंदर फोटो शेअर करत म्हटलं आहे की, डोळं नाही थार्याला…लव लव करी पातं… सध्या तिची ही कॅप्शन सर्वांचे लक्षवेधून घेत आहे.
4/ 11
कॅप्शनला शोभेल असेच प्राजक्ताचे देखील फोटो आहेत.
5/ 11
म्हणून तर प्राजक्ताच्या कॅप्शनची चाहत्यांमध्ये चर्चा रंगलेली आहे.
6/ 11
प्राजक्ता माळीनं काही दिवसापूर्वी केशरी रंगाच्या एक आसामी सिल्क साडीमध्ये सुंदर असं फोटोशूट केलं होतं. या फोटोशूटमुळं तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.
7/ 11
काही इन्स्टाग्राम युजर्सनी तिच्या या लुकबाबत भलत्याच कमेंट्स केल्या होत्या. 'ब्लाउज कुठे आहे?', 'ब्लाउज घालायला विसरली का?', अशा आशयाच्या कमेंट्स काहींनी केल्या होत्या.
8/ 11
साडीवर ब्लाऊज न परिधान करणं ही कसली फॅशन असा सवाल चाहत्यांना पडला होता. त्यामुळे काही जणांनी अभिनेत्रीला ट्रोल केलं होतं.
9/ 11
‘जुळून येती रेशीम गाठी’ या मराठी मालिकेमुळे प्राजक्ता प्रकाशझोतात आली.
10/ 11
'हंपी', 'पावनखिंड', 'पांडू', 'खो-खो' या सिनेमांमध्ये तिने महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. सध्या ती 'महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कॉमेडी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करते.
11/ 11
पावनखिंड या सिनेमातील तिचा पारंपरिक मराठमोळा लुकही चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता. (फोटो साभार- प्राजक्ता माळी इन्स्टा)