सध्या तु तेव्हा तशी मालिकेतून वल्ली म्हणून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री अभिज्ञा भावे मागील काही महिन्यात वैयक्तिक आयुष्यात फार मोठ्या संकटाला तोंड देत होती. अभिज्ञा भावेचा नवरा मेहुल पैला कॅन्सर झाला होता. मात्र मेहुलनं यशस्वीरित्या कॅन्सरवर मात केली आहे. मेहुलचा बदललेला लुक समोर आला आहे.
अभिनेत्री अभिज्ञा भावेने जानेवारी 2021 मध्ये मेहुल पै याच्याशी लग्नगाठ बांधली.
2/ 9
मात्र लग्नानंतर काही दिवसातच त्या दोघांना एका संकटाचा सामना करावा लागला होता. अभिज्ञाच्या नवऱ्याला कॅन्सरचं निदान झालं होतं.
3/ 9
मात्र आता मेहुलची तब्येत आधीपेक्षा खूप सुधारली आहे. त्याची प्रकृती उत्तम आहे आणि तो रिकव्हरी मोडमध्ये आहे.
4/ 9
मेहुल आता कामावर परतला असून तो स्वतःची पूर्ण काळजी घेत आहे, पथ्य पाळत आहे, असं अभिज्ञाने एक मुलाखतीत सांगितलं होतं.
5/ 9
अभिज्ञा आणि मेहुल सोशल मीडियावर बरेच ऍक्टिव्ह असतात. मेहुलच्या ट्रिटमेंटनंतरचा बदललेला लुक समोर आला आहे.
6/ 9
आधीचा मेहुल आणि ट्रिटमेंटनंतरच्या मेहुलला पाहून चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. मेहुल आताही तितकाच कॉन्फिडन्ट दिसत आहे.
7/ 9
अभिज्ञाने अगदी मेहुलच्या ट्रिटमेंट दरम्यानचे सकारात्मक फोटो आणि व्हिडीओ सुद्धा चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. त्यामुळे त्याची होणारी प्रगती पाहून चाहत्यांनीही आनंद आणि प्रेम व्यक्त केलं आहे.
8/ 9
अभिज्ञा आणि मेहुलच्या आयुष्यात काही काळासाठी हे संकट आलं होतं मात्र या दोघांनीही एकमेकांना साथ देत खंबीरपणे या संकटाचा सामना केला.
9/ 9
काही दिवसांपूर्वीच मेहुलचा वाढदिवस झाला तेव्हा अभिज्ञानं त्याला खास सप्राइज दिलं होतं. त्याच्यासाठी लिहिलेली खास पोस्टही चर्चेत आली होती.