अभिज्ञानं केली ब्रिटनच्या राजकुमारीची नक्कल?; रॉयल PHOTO होतायेत व्हायरल
‘शी इज अ क्वीन’… मराठमोळ्या अभिनेत्रीचा ब्रिटीश अवतार; रॉयल रेट्रो फोटो पाहून व्हाल थक्क
|
1/ 10
‘तुला पाहते रे’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिज्ञा भावे ही मराठी मनोरंजनसृष्टीतील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. (Abhidnya bhave/Instagram)
2/ 10
अभिनयासोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. (Abhidnya bhave/Instagram)
3/ 10
ऑनलाईन ब्लॉग्स, फोटो, ट्विट्स आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. (Abhidnya bhave/Instagram)
4/ 10
यावेळी देखील तिनं असेच काही ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Abhidnya bhave/Instagram)
5/ 10
लक्षवेधी बाब म्हणजे या फोटोशूटसाठी तिनं ब्रिटीश शैलीचा रॉयल रेट्रो लूक धारण केला होता. (Abhidnya bhave/Instagram)
6/ 10
“ती राणी आहे. फरक फक्त इतकाच की तिचा आत्मा श्रीमंत होता” अशा आशयाची कॉमेंट तिनं या फोटोंवर केली आहे. (Abhidnya bhave/Instagram)
7/ 10
या फोटोंच्या माध्यमातून तिनं ब्रिटनची दिवंगत राजकुमारी डाएना (Princess of Wales Diana) हिला श्रद्धांजली वाहिली आहे. (Abhidnya bhave/Instagram)
8/ 10
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. (Abhidnya bhave/Instagram)
9/ 10
“तू तर ब्रिटनच्या राणीपेक्षा अधिक सुंदर दिसते आहेस” अशा आशयाच्या प्रतिक्रिया देऊन चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे. (Abhidnya bhave/Instagram)
10/ 10
अभिज्ञानं देवयानी, खुलता कळी खुलेना, तुला पाहते रे, रंग माझा वेगळा यांसारख्या अनेक मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. (Abhidnya bhave/Instagram)