TV अभिनेत्रीची मोठी घोषणा; या कारणामुळं अभिनय क्षेत्राला ठोकला कायमचा रामराम
सना खाननंतर आणखी एका अभिनेत्रीनं घेतली अभिनयातून निवृत्ती
|
1/ 10
कुसुम या मालिकेतून घराघरात पोहोचलेली आश्का गोराडिया ही छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
2/ 10
परंतु आश्कानं आता अभिनयाला कायमचा रामराम ठोकला आहे. तिनं अभिनयसृष्टीतून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
3/ 10
नुकतीच बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तिनं अभिनय सोडण्यामागचं खरं कारण सांगितलं.
4/ 10
खरं तर आश्काला अभिनयात फारसा रस कधीच नव्हता. तिला एक मेकअप आर्टिस्ट व्हायचं होतं. परंतु अपघातानं ती या क्षेत्रात आली होती.
5/ 10
पहिल्याच मालिकेमुळं तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली अन् तिच्याकडे काम येत गेलं. परिणामी चाहत्यांसाठी ती काम करत होती. पण आता ती अभिनयाला कंटाळली आहे. त्यामुळं तिनं निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.
6/ 10
आश्काला आता सौंदर्यप्रसाधनांचा व्यवसाय करायचा आहे. त्यासाठी तिनं आपल्या पतीच्या मदतीनं काही वर्षांपूर्वी एका कंपनीची निर्मिती देखील केली होती.
7/ 10
अन् या तिला आपलं संपूर्ण लक्ष या कंपनीकडे द्यायचं आहे. शिवाय तिला जगभरात फिरायचं आहे. परंतु मालिकांच्या व्यस्त वेळाप्रत्रकामुळं तिला शक्य होत नव्हतं.
8/ 10
आश्काला व्यायामाची देखील प्रचंड आवड आहे. आपल्या पतीसोबत योगा करतानाचे फोटो ती सोशल मीडियावर सतत शेअर करत असते.
9/ 10
आश्कानं 2003 साली भाभी या मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिनं तुम बिन जाऊ कहा?, कयामत, कुसुम, अकेला, जेट सेट गो यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं होतं.
10/ 10
गेल्या काही काळात तिनं बालवीर आणि नागिन यांसारख्या सायंस फिक्शन मालिकांमध्ये खलनायिकांची व्यक्तिरेखा साकारली होती.