

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या मुलीचा आज 21 वा वाढदिवस. आमिरनं इराच्या 21व्या वाढदिवसाला त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या लहानपणीचा एक फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या.


यावेळी आमिरनं इरासाठी खास मेसेजही लिहिला, 'Happy 21st @khan.ira !!! माझा अजूनही विश्वास नाही बसत की, तू एवढ्या लवकर मोठी झालीस. तू कितीही मोठी झालीस तरीही माझ्यासाठी नेहमीच 6 वर्षांची लहान मुलगीच राहशील. लव्ह यू. पापा'


आमिरनं इराला शुभेच्छा देण्यासाठी शेअर केलेला हा फोटो 21 जानेवारी 2005मध्ये क्लिक केलेला असून त्यात तो 'मंगल पांडे' या सिनेमातील लुकमध्ये आहे. तर इरानं यावेळी मरुन रंगाची कुर्ती आणि हिरव्या दुपट्ट्यामध्ये दिसत आहे.


इरा ही आमिर आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्ता यांची मुलगी आहे. त्याशिवाय या दोघांना जुनैद खान नावाचा एक मुलगाही आहे. आमिर आणि रीनानं 1986मध्ये लग्न केलं होतं मात्र 2002मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.