

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि अभिनेत्री जूही चावला यांना साधारणपणे एकत्रच बॉलिवूडमधील करिअरला सुरूवात केली होती. 1988 रोजी रीलिज झालेल्या कयामत सें कयामत तक या सिनेमामध्ये आमिर आणि जूहीची जोडी हिट झाली होती. या फिल्मला प्रेक्षकांचा भरपूर पाठिंबा मिळाला होता. त्यानंतरही काम सिनेमांमधून त्यांनी एकत्र काम केलं. पण इश्क (Ishq) या सिनेमानंतर जूही आणि आमिरची जोडी कधीच एकत्र पडद्यावर झळकली नाही.


काही दिवसांपूर्वीच इश्क सिनेमाला 23 वर्ष पूर्ण झाली आहेत. या चित्रपटामध्ये जूही आणि आमिरशिवाय काजोल आणि अजय देवगण यांच्या मुख्य भूमिका होत्या.


आमिर आणि जूही एकमेकांचे चांगले मित्र होते. पण इश्क सिनेमाचं शूटिंग सुरू असताना आमिरने जूहीची मस्करी केली. याचा जूहीला प्रचंड राग आला आणि त्यांच्यात वाद झाला.


मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार, शूटिंगच्या सेटवर असताना आमिरने जूहीला सांगितलं की, मला ज्योतिष विद्येचं ज्ञान आहे. तुझा हा बघून मी तुझं भविष्य सांगू शकतो. जूहीने त्याला हात दाखवला. तर आमिर चक्क तिच्या हातावर थुंकला. जूहीला त्याची ही मस्करी अजिबात आवडली नाही. ती त्याच्यावर प्रचंड रागवली.