आमिर खानचा 'दंगल' (Aamir Khan Dangal) हा सिनेमा गीता आणि बबिता फोगट या भारतीय कुस्तीपटूंच्या जीवनावर आधारित होता. ज्येष्ठ कुस्तीपटू महावीर फोगट यांनी आपल्या मुलींना कुस्तीपटू कसे बनवले हे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. तुम्हाला या चित्रपटात छोट्या बबिताची भूमिका कुणी केली आठवतंय का? (Instagram/bhatnagarsuhani)
दंगल हा सिनेमा 6 वर्षांपूर्वी मोठ्या पडद्यावर आला होता. या चित्रपटात सुहानी भटनागर हिने बबिताचे बालपण साकारले. सिनेमातील कथानकाप्रमाणे ती अगदी मुलांप्रमाणे कापलेल्या केसांमध्ये दिसली होती. तिच्या लेटेस्ट फोटोंमध्ये तिचे सुंदर केस तर दिसत आहेतच, पण तिचा लुकही फार क्युट दिसत आहे. (Instagram/bhatnagarsuhani)