कोरोना संकटामुळे जगभरात लॉकडाऊन करण्यात आला होता. याचा मनोरंजन क्षेत्रावरही मोठा परिणाम झाला होता. आता हळूहळू सगळं पूर्वपदावर येत आहे. लॉकडाऊनमुळे जवळपास 8 महिने बंद असलेली सिनेमागृह आता सुरू झाली आहेत. सिनेमांचं शूटिंगही सुरू झालं आहे. सिनेमागृह सुरू झाल्यानंतर आमिर खान (Aamir Khan) त्यांच्या मुलीसोबत ‘सूरज पें मंगल भारी’ हा सिनेमा बघायला गेला होता.