Aai Kuthe Kay Karte: आईला झाली लेकावर ओढवणाऱ्या संकटाची चाहूल; यशचा होणार मोठा अपघात?
आई कुठे काय करते या मालिकेत आता आईच्या म्हणजेच अरुंधतीच्या आयुष्याची नवी सुरुवात झाली आहे. पण आता मालिकेत पुन्हा मोठा ट्विस्ट येणार आहे. अरुंधतीच्या लेकाच्या जीवावर मोठं संकट ओढवणार आहे.
'आई कुठे काय करते' ची सध्या प्रचंड चर्चा आहे. मालिकेत सुरु असलेल्या कथानकामुळं सध्या सगळ्यांचंच लक्ष मालिकेवर वेधलं आहे.
2/ 8
मालिकेत यश आणि गौरीचं ब्रेकअप झालं असून गौरी कायमची त्याला सोडून निघून गेली आहे.
3/ 8
अरुंधती यशला या सगळ्यातून बाहेर काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. पण आता तिला ज्याची भीती होती तेच घडणार आहे.
4/ 8
एकीकडे ईशाने अनिश सोबत पळून जाण्याचा निर्णय घेतलाय तर दुसरीकडे यशचा जीव धोक्यात असणार आहे.
5/ 8
मालिकेच्या आगामी भागात अरुंधती यश तिचा फोन उचलत नाही म्हणून अस्वस्थ होते. त्यानंतर तिला यशचा अपघात होतो असं स्वप्न पडतं.
6/ 8
तर दुसरीकडे यश एका चहाच्या टपरीवर उभा असतो तिथे तो एका कपलला पाहतो. त्या दोघांना पाहून यशला गौरीची आठवण सतावते. तिच्याच आठवणीत तो तिथून निघतो.
7/ 8
त्यानंतर ती आशुतोष सोबत यशला शोधायला बाहेर पडते. आणि रस्त्यात तिला एका ठिकाणी कोणाचा तरी अपघात झाल्याचं दिसतं. पोलीस एका तरुण मुलाचा अपघात झाल्याचं अरुंधतीला सांगतात.
8/ 8
आता अरुंधतीला यशच्या अपघाताचं पडलेलं स्वप्न खरंच सत्यात उतरणार का, यशचा खर्च मोठा अपघात होणार आहे का ते मालिकेच्या आगामी भागात समोर येईल.