आई कुठे काय करते मालिकेत अरुंधतीचा लग्नसोहळा सुरू आहे. मालिका सध्या चांगली रंगली असून कथानकानं सर्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. आपल्या सवतीच्या लग्नाची जल्लोषात तयारी करत असलेल्या संजनाला पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. संजना अरुंधतीच्या लग्नासाठी खूपच उत्साही आहे. लग्नासाठी तिनं खास साडी घेतलीये. ज्याची चांगलीच चर्चा होतेय. संजनानं अस्सल बनारसी साडी अरुंंधतीच्या लग्नासाठी निवडली आहे. संजना दिसायला तर देखणी आहेच पण साडीबरोबर ऑक्सिडाईज ज्वेलरी, नाकात नथ, गळ्यात छोट्याश्या मंगळसूत्रानं संजनाच्या लुकला चार चांद लावले आहेत. अरुंधतीच्या लग्नाच्या वरातीत संजना दणकून नाचताना देखील दिसणार आहे. महिला दिन विशेष भागात अरुंधतीचं लग्न पाहायला मिळणार आहे.