Punam Chandorkar : अरुंधतीला लग्न करण्याची गरजच काय आहे? ऑनस्क्रिन नणंदनं सांगितली मन की बात
आई कुठे काय करते मालिकेत अरुंधतीचं लग्न झाल्यानंतर अनेकजण याविषयी आपलं मत मांडताना दिसत आहेत. दरम्यान मालिकेतील विशाखा म्हणजेच अभिनेत्री पुनम चांदोरकर हिनं अरुंधतीच्या लग्नाविषयी खास पोस्ट लिहिली आहे.
आई कुठे काय करते या मालिकेची सध्या सर्वत्र चर्चा आहे. नुकतंच अरूंधती आणि आशुतोषचं लग्न झालंय.
2/ 8
अरुंधतीनं या वयात लग्न करायची गरज आहे? असा प्रश्न मालिकेतील काही पत्रांप्रमाणेच काही प्रेक्षकांनाही पडला.
3/ 8
अरुंधतीची नणंद विशाखानं मालिकेत सुंदर अभिनय केला आहे. विशाखा म्हणजेच अभिनेत्री पुनम चांदोरकरनं मालिकेविषयी आणि अरुंधतीच्या लग्नाविषयी खास पोस्ट लिहिली आहे.
4/ 8
पुनमनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिनं म्हटलंय, "मागचा एक महिना फक्त अरुंधती आणि अरुंधतीच लग्न हा एकच विषय सगळ्यांसाठी होता.
5/ 8
"अरुंधती लग्न नक्की करणार का? तर अरुंधतीला लग्न करण्याची गरज काय आहे ? इथपर्यंत सगळ्या चर्चा आणि नुसत्या चर्चा".
6/ 8
"पण या सगळ्यातून फायनली अरुंधती आणि आशुतोष यांचं लग्न संपन्न झालं. खूप मजा आली."
7/ 8
" एकंदर एक व्यक्ती म्हणून विचार करताना असं वाटलं की फक्त सिरीयलसाठी नाही तर वैयक्तिक आयुष्यातही अशा अनेक स्त्रिया आहेत ज्यांना मानाने आणि आनंदाने जगण्याचा अधिकार आहे मग तो अधिकार हिरावून घेणारे आपण कोण हो ना"
8/ 8
अभिनेत्री पुनमनं लिहिलेल्या या पोस्टला तिच्या चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.